वीरशैव लिंगायत शिवशिंपी समाजाच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार

 वीरशैव लिंगायत शिवशिंपी समाजाच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार 


   लातूर/प्रतिनिधी:वीरशैव लिंगायत शिवशिंपी समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह कोविड काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील लिंगायत समाज चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नागराज अंबेसंगे,सचिव शैलेश नेरुने,सहसचिव अजय अंबेसंगे यांच्यासह राजशेखर ममदापूरे,
चंद्रकांत ममदापूरे,रतिकांत अंबेसंगे यांच्यासह लातूर लिंगायत शिवशिंपी समाजाचे अध्यक्ष दयानंद सावळगी,सचिव रवींद्र अंबेसंगे,प्रा.महादेव छपरे यांची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच कोविड कालावधीत जबाबदारी पार पाडणारे श्रीपाद अंबेसंगे, राजकुमार सोंत,योगेश अंबुलगे, विवेकानंद रुग्णालयातील महेश अंबुलगे यांचाही सन्मान करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने