मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी गौरव काथवटे


 मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी गौरव काथवटे


 लातूर/प्रतिनिधी:मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक गौरव काथवटे यांची निवड करण्यात आली.
   महामंडळाच्या सर्व सभासदांची बैठक संस्थापक अशोक गोविंदपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुर्णानंद मंगल कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सन २०२२-२३ या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यांत आली.यात अध्यक्ष गौरव काथवटे,कार्याध्यक्ष ॲड. गोपाळ बुरबुरे,उपाध्यक्षपदी
अनमोल गवारे,धुळप्पा आरबळे, सचिव सुमुख गोविंदपुरकर, सहसचिव अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे,कोषाध्यक्ष योगेश उन्हाळे यांचा समावेश आहे.
    या बैठकीस महामंडळाचे संस्थापक सचिव बसवंतप्पा भरडे,दत्तात्रेय मुंढे,अशोक वरियाणी,वीरभद्र वाले,सुनिल कोटलवार,अविनाश परांडेकर, अरुण कोटे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने