आझाद महाविद्यालयास नॅक चे बी+ मानांकन..

आझाद महाविद्यालयास नॅक चे बी+ मानांकन



औसा/ प्रतिनिधी : - हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी द्वारे संचलित आझाद महाविद्यालयाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदने (नॅक) नुकत्याच केलेल्या मूल्यांकनात २.७३ सीजीपीए सह बी+ मानांकन दिले आहे. 'नॅक'ची त्रिसदस्यीय समिती यामध्ये डॉ.अजमेर सिंग मलिक, डॉ.गुलाम मोहम्मद भट्ट, डॉ.संजयकुमार शाह यांनी दि. ३ व ४ ऑगस्ट रोजी महाविद्यालयास भेट देऊन  मूल्यांकन केले. या समितीने महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी, आजी माजी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद, महाविद्यालयात असणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी तसेच महाविद्यालयाद्वारे चालणारे विविध उपक्रम तपासून समितीने महाविद्यालयास २.७३ सीजीपीए सह बी+ मानांकन दिले आहे. या मानांकन प्रक्रियेमध्ये उपप्राचार्य टी.ए जहागीरदार, नॅक समन्वयक प्रा.डॉ एम.ए बरोटे, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ एन.के सय्यद, सात निकष प्रमुख प्रा.डॉ एम.बी झाडे, प्रा.डॉ एस. बी शेख, प्रा.डॉ आर.व्ही सूर्यवंशी, प्रा डॉ.एम.एम इनामदार, प्रा.डॉ डी.डी क्षीरसागर, प्रा.डॉ बी.डी इंगळे, प्रा.डॉ ए. व्ही पठाण व त्यांचे सहकारी यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. या सर्व  प्राध्यापकाना प्राचार्य डॉ ई.यू मासूमदार यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नॅक ची संपूर्ण तयारी करून घेतली. महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल या सर्वांचे संस्था सचिव डॉ.अफसर शेख, अध्यक्ष संजय कुलकर्णी, अरब सर, जावेद शेख सर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने