औसा पंचायत समितीच्या गोदामातून नांगर चोरीला

औसा पंचायत समितीच्या गोदामातून नांगर चोरीला 


औसा /प्रतिनिधी : - औसा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कृषी विभागाच्या औसा येथील गोदामातून 36 नांगर चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे नांगर कसे काय चोरीला गेले ? यात कोण अधिकारी कर्मचारी सामील तर नाहीत ना ? याबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे. पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध कृषी अवजारे देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत असलेली कृषीची सर्व साहित्य कृषी विभागाच्या औसा येथील गोदामात ठेवली जातात. या साहित्यापैकी सरीसाठीचे असलेले 36 नांगर किंमत प्रत्येकी 2600/- याप्रमाणे 93 हजार 600 रुपये चे नांगर चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या काळात कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे नांगर एका रात्रीतून चोरीला गेले नसून, दि.05 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान 36 नांगर चोरले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या चोरी प्रकरणात चोरी शिवाय अन्य कोणी कर्मचारी सहभागी आहेत का ? सीसीटीव्ही लावले नाहीत का ? आधी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. शासकीय योजनातील साहित्याच्या रक्षणासंदर्भात एवढी अनास्था का दाखवली जाते, असाही प्रश्न  विचारला जात आहे. या 36 नांगर चोरी प्रकरणी पोलीस प्रशासनाने बारकाईने तपास करून चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने