स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायतांना सत्तेत चांगला वाटा द्यावा अन्यथा समाजाच्या एकजुटीने 100 सदस्य निवडून आणू -सुदर्शन बिरादार
लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने टिपराळ ता.शिरूर अनंतपाळ येथे लिंगायत समाज मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि.8 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.बिरादार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत लिंगायत समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात चांगला वाटा द्यावा. अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका या निवडणूकीत लिंगायत समाजाच्या एकजुटीने 100 च्या वर सदस्य निवडून आणू.
ते पुढे म्हणाले लिंगायत समाजाच्या मताचा फायदा प्रत्येक राजकीय पक्षाने घेतला. पण लिंगायत समाजाला न्याय देताना प्रत्येक पक्षाने आपला हात आखडता घेतला. त्यामुळे मागील नगर पंचायतीच्या निवडणूकीवेळी समाजाने असे ठरविले होते की, कोणत्याही पक्षातून समाजाचा उमेदवार निवडणूक लढवित असल्यास त्याला निवडून द्यायचे. त्याचा परिणाम असा झाला 4 नगर पंचायतीच्या निवडणूकीत 68 नगरसेवकापैकी 34 नगरसेवक लिंगायताचे निवडून आले. 2 नगराध्यक्ष, 3 उपनगराध्यक्ष, कमिटीचे सभापती व स्विकृत सदस्य एवढी संख्या निवडून आली. आता होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय पक्षांनी न्याय भुमिका घेतली नाही तर लिंगायत समाजाच्या एकजुटीच्या माध्यमातून 100 च्या वर सदस्य निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याबरोबरच राजकीय पक्षांना त्यांनी विनंती केली ठराविक घराण्याला पदे देवून लिंगायतांना पदे दिली असे समजुन सर्वसामान्य लिंगायतांवर अन्याय केल्यास त्याचा परिणाम पक्षांना भोगावा लागेल असा इशाराही प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी दिला. लिंगायत महासंघ ही समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविणारी संघटना असून लिंगायतांना आरक्षण मिळेपर्यंत संघटना लढा देतच राहील. या कार्यक्रमात लिंगायत महासंघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत कालापाटील यांचा तर जिल्हाध्यक्ष झाल्याबद्दल कमलाकर डोके, काशीनाथ मोरखंडे यांची जिल्हा संघटकपदी, गणेश पटणे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, प्रा.डॉ.पंडीत देवशेट्टे, करीबसवेश्वर पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्वच मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष शंकरे, नवनाथ डोंगरे, गणेश पटणे, कमलाकर डोके व प्रा.सुदर्शनराव बिरादार आदिंची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी लिंगायत महासंघाचे निलंगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, रेणापूर तालुकाध्यक्ष राजेश्वर उकीरडे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, अहमदपूर तालुकाध्यक्ष महेश भिंगोले, चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, गजानन पाटील, कपील माकणे, अशोक काडादी, एन.आर.स्वामी, रामेश्वर तेली, प्रा.महेश धोंडीहिप्परगेकर, उदगीर शहराध्यक्ष सुभाष शेरे, विश्वनाथ सावळे स्वामी, संगय्या स्वामी, विजय बापटले, संयोजक लिंगेश्वर बिरादार, त्र्यंबक बिरादार, संग्राम बिरादार, विठ्ठलराव पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर, ग्रामस्थ व परिसरातील समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विठ्ठलराव पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा