विलास साखर कारखाना कार्यस्थळी
गणेशोत्सव उत्साहात साजरा
लातूर प्रतिनिधी : विलास सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी विलास साखर गणेशोत्सव मंडळाकडून श्री गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत भावीकभक्तांसाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन, व्याख्यानमाले अंतर्गत वक्त्यांचे मार्गदर्शन, मनोरंजनासाठी सांगितीक कार्यक्रम, तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या कार्यध्यक्षतेखाली विलास साखर गणेश मंडळाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
भावीकभक्तासाठी भजन कार्यक्रम
विलास साखर गणेशमंडळाकडून गणेशोत्सव काळात सकाळ, संध्याकाळ गणपतीची पुजाअर्जा करण्यात आली. भावीकासाठी भजन कार्यक्रमाचे नियमीत आयोजन करण्यात आले. यामुळे कारखाना स्थळी भक्तीपूर्ण वातावरण तयार झाले.
विलास साखर व्याख्यानमाला
गणेशोत्सव काळात कवी योगीराज माने यांनी आठवणीतील कवीता, हास्य कवीतासह आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे वरील चांगली कविता सादर केली , तर संत चरित्र जगण्याचा सन्मार्ग या विषयावर प्रा. गणेश बेळबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यस्थळी चांगला प्रतीसाद मिळाला.
कर्मचाऱ्याच्या गुणवंत पाल्याचा सत्कार
कारखान्यातील कर्मचारी व कामगारांच्या पाल्यांना १० वी, १२ वी, पदवी व पदवीकामध्ये मिळवीलेल्या यशाचे गणेशोत्सव निमित्ताने गुणगौरव केला जातो. यावर्षी १० वी मध्ये श्रावणी उत्तम सांळूके, श्रध्दा संजय माने, १२ वी मध्ये वैष्णवी माधव कदम, सुमीत प्रल्हाद वांगसकर, श्वेता सुभाष गायकवाड, प्रिती चंद्रसेन शिंदे पदवी परीक्षेत शुभम गुणवंत चिगुरे, समाधान चंद्रसेन शिंदे व पदवीकामध्ये वैष्णवी आनंद मोरे, अमोल शशीकांत मंगले यांनी यश प्राप्त केले. या सर्वांना प्रादेशिक सहसंचालक, नांदेड श्री एस.बी.रावल यांच्या हस्ते पारीतोषीके प्रदान करण्यात आली.
मनोरंजन कार्यक्रम
विलास सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी प्रतिवर्षा प्रमाणे विलास साखर गणेशोत्सव मंडळाकडून विविध मनोरंजन करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पुणे येथील हिम्मतकूमार पंडया यांच्या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विलास साखर गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आलेले कार्यक्रम व राबविण्यात आलेले उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सहकार्याध्यक्ष एल.एम.देशमुख, सी.एच. कानवटे, श्रीकृष्ण झारे, रवीकीरण सोमवंशी, गजानन पाटील, विश्वनाथ नितळे, श्रीकृष्ण सांळूके, यशवंत पाटील, व्यंकटराव मोरे, गणेश थोडसरे, प्रविण पंडीत, प्रल्हाद कच्छवे, सुरेश भक्ते, रंगनाथ कदम, दिनेश गायकवाड यांनी परीश्रम केले.
टिप्पणी पोस्ट करा