नीट 2022 परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांनी राखली सर्वोत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा
श्री त्रिपुरा महाविद्यालयातून एकूण 426 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी दि. 08 सप्टेंबर 2022 पर्यंत हाती लागलेल्या निकालाप्रमाणे 14 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. यामध्ये आदित्य ईश्वर सेनानी याने एकूण 680 गुण घेऊन ऑल इंडिया रँक 831 मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, प्रतीक्षा प्रकाश देसाई हिने - 655 गुण, भरत पटेल - 630 गुण घेऊन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. 39+ विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा अधिक गुण संपादित केले, तर 72 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण घेऊन यश संपादन केले. 600 पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.
आदित्य सेनानी (680), प्रतीक्षा देसाई (655), भरत पटेल (630), तन्मय ढोले (623), संदीप कदम (622), झिक्रा कासीम (621), अदिती चव्हाण (616), शेख निशात (613), मोहम्मद असगर सय्यद (611), भाविक रोहिले (611), करण काळे (610), फझल पठाण (606), सिद्धाराम गवळी (605), पुष्कराज देठे (605) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले आहे.
श्री त्रिपुरा महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्टा करून हे यश संपादन केलेले आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, संस्थेच्या सचिव तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. सुलक्षणा केवळराम, संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. प्रेरणा होनराव, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, उपप्राचार्य मा. राजकुमार केदासे, प्रा. मनोहर कबाडे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सुनील कुमार वर्मा, प्रा. शैलेंद्र परिहार, प्रा. विकास कुमार सोनी, प्रा. सतिष पाटील, प्रा. दीपक होनराव, प्रा. श्रीराम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यश प्राप्तीसाठी कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा