शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा

शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा




 लातूर- येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी स्कूलचे प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 यावेळी स्कलमध्ये विविध उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एका दिवसासाठी शिक्षक झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांनीही आपल्यातील कलागुण सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
 यावेळी डॉ. एम. आर. पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या शिक्षक, संशोधक ते राष्ट्रपती या प्रवासावर प्रकाश टाकला. सर्वांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आकांक्षा देशमुख यांनी केले. आभार शीला शेळके यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने