गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशालेतविद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी


 गोदावरीदेवी  लाहोटी कन्या प्रशालेत
विद्यार्थिनींची  हिमोग्लोबिन तपासणी 


लातूर : रोटरी क्लब ऑफ़ लातूर सेंट्रल व  दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या   संयुक्त विद्यमाने येथील गोदावरीदेवी  लाहोटी कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींची  हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८०० मुलींची  हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली . 
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष  लक्ष्मीरमण लाहोटी हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब लातूर  सेंट्रलचे अध्यक्ष हेमंत रामढवे,  दयानंद शिक्षण  संस्थेचे  कोषाध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ़ लातूर सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष संजय बोरा, 
रोटरी क्लब लातूर  सेंट्रलचे सचिव बाळासाहेब खैरे,  प्रोजेक्ट चेअरमन रवींद्र चामले,  शालेय शिक्षण समितीचे भराडीया, गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशालेच्या  मुख्याध्यापिका सौ सुचिता बोरगावकर, डॉ सुनिता बजाज,  डॉ संध्या वारद यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना  लक्ष्मीरमण लाहोटी यांनी विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन तपासणीचा हा उपक्रम त्यांच्या स्वास्थाचा विचार करून घेण्यात आल्याचे सांगितले. या प्रसंगी रोटरी सदस्य राजगोपाल मुंदडा,मिलिंद आंबेकर,   चंद्रकांत गुंडरे , विनोद पंडगे, मेहुल कामदार, गिरीश गारटे, भालचंद्र थळकरी, गिरीश ब्याळे , पुरुषोत्तम नोगजा, शिंदे ,  डॉ नेताजी शिंगटे, वैभव बेल्लाळे , सोमेश कान्नव, दयानंद फार्मसी कॉलेज व प्रशालेतील सर्व शिक्षक - शिक्षिका,  विद्यार्थीनींची यावेळी उपस्थिती होती. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आलेल्या मुलींवर योग्य ते उपचारही करण्यात आले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुवर्णा डोईजोडे यांनी केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने