अमर गणेश मंडळाचे मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला देखाव्यातून अभिवादन

अमर गणेश मंडळाचे मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला देखाव्यातून अभिवादन



   लातुर दिं ७. काळ निजामशाहीचा होता, मोठी दहशत होती. एकीकडे देश स्वातंत्र्य झाला म्हणून जल्लोष होता...लातूर मधील तरुणांनी अत्यंत धाडसाने,निजाम पोलीसांचा कडक पाहरा असताना त्यांना चकम्मा देऊन गंजगोलाईवर निजामशाहीचा फडकणारा ध्वज उतरवून तिरंगा चढवला होता. ती रोम हर्षक घटनाच कामदार रोडवरील अमर गणेश मंडळांने लेजर शो च्या माध्यमातून सादर केली आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पाहण्यासाठी शेकडो लातूरकर येत आहेत. या देखाव्याचे उदघाटन
थोर स्वातंत्र्य सेनानी मुर्गप्पा खुमसे यांच्या हस्ते झाले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते.
    या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार ,संपादक अशोक चिंचोले,नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, ज्येष्ठ विधिज्ञ उदय गवारे,सह्याद्रि वाहिनीचे प्रतिनिधि दिपरत्न निलंगेकर यांची प्रमुख उपस्थित होते.
   मराठवाडा मुक्तिसंग्रामात लातुरकरांचा सिंहाचा वाटा असून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली लातुरचे असंख्य क्रांतीकारक  या मुक्ती आंदोलनातील  धाडसी उपक्रमात सक्रिय होते. निजामाला सळो की पळो करुन सोडण्यासाठी लातुरकरानी विविध मार्गाने आंदोलन तीव्र केले यातीलच एक घटना म्हणजे लातुरच्या गंजगोलाईतील निजामशाही टावरवर असलेला निजामशाही ध्वज उतरुन त्याठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा लावण्याचे काम लातुरच्या बहादुर स्वातंत्र्यसेनानीनी केल्याचे मुर्गप्पा खुमसे म्हणाले.
  मराठवाडा मुक्ती  संग्रामातील लातूर जिल्ह्यातील योगदान हे अनन्य साधारण असे आहे. गंजगोलाईवर तिरंगा फडकावणे ही घटना तर मुक्ती लढ्यातील सोनेरी पान आहे, त्या रोमहर्षक ऐतिहासिक घटनेला लेजर शो च्या माध्यमातून अमर गणेश मंडळाने देखाव्याच्या रूपात दाखवून उजाळा दिला. येणाऱ्या 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षे सुरु होतं आहे. अशा प्रसंगी असा देखावा दाखवून अमर गणेश मंडळाने या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवातच केली असल्याची भावना जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी बोलून दाखविली.
 या स्वातंत्र्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यानी केलेला त्याग, बलिदान त्या प्रती कृतज्ञता म्हणून हा देखावा तयार केला आहे, तो लातूरकरांनी पाहावा असे आवाहन अमर मंडळाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने