विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिक्षा पॅडचे वाटप

 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिक्षा पॅडचे वाटप


औसा -जिजामाता विद्यालय औसा येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे व तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने यांच्या शुभहस्ते तसेच विधानसभा संघटक महेश बनसोडे,शहराध्यक्ष प्रवीण (वाघा) कठारे,इंडियन गॅस एजन्सीचे मालक चेतन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी मनसेचे महादेव गुरुशेट्टे,रामप्रसाद दत्त,बळीराम कठारे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ सूर्यवंशी ,बिसैनी सर, शिंदे सर,तोळमारे सर,खरपडे सर,फुलारी सर,औटी मॅडम, भालेराव मॅडम,राजपूत समाजाचे शहराध्यक्ष संतोष वर्मा यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने