शेतकरी हाच पक्ष आणि शेतकरी हित हेच उद्दिष्ट- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

 शेतकरी हाच पक्ष आणि शेतकरी हित हेच उद्दिष्ट- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर


निलंगा/प्रतिनिधी-- स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकरी हिताला केंद्रबिंदू मानत या कारखान्याची उभारणा केलेली होती. आता शेतकरी हितालाच प्राधान्य देत या कारखान्याला कोणताही राजकीय स्पर्श होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन शेतकरी हाच पक्ष आणि शेतकरी हित हेच उद्दिष्ट असेल असा विश्वास माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना  भाडेतत्वावर चालविण्यासाठी ओकार शुगर्स प्रा. लिं. ने घेतलेला आहे. या कारखाना प्रशासनाच्या वतीने कारखान्यांची विभागीय कार्यालये निलंगा, निटूर, औराद शहाजनी व वलांडी येथे सुरु करण्यात आलेली असून या कार्यालयांचा शुभारंभ करीत असताना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, दगडू सोळूंके, निलंगा तालुका अध्यक्ष शाहुराज थेटे, शिरुर अनंतपाळ तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, देवणी तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे, निलंगा शहराध्यक्ष अ‍ॅड. विरभद्र स्वामी, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, कार्यकारी संचालक उमाकांत कांदे, अंबादास जाधव, शेतकी अधिकारी  एस.आर. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकर्‍याच्या जीवनात क्रांती घडावी आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने अंबुलगा येथे स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी साखर कारखान्याची उभारणी मोठ्या दुरदृष्टीतून केली होती, असे सांगत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कारखाना उभारताना प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्यात आले होते. हा कारखाना ज्या उद्देशाने चालू केला होता तोच उद्देश आगामी काळातही डोळ्यासमोर ठेऊन आणि शेतकर्‍यांचे हित अधिक चांगल्या रितीने व्हावे याकरीता बाबुराव बोत्रे यांच्यासारख्या माणसाच्या हाती हा कारखाना चालविण्यासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. निश्चितच त्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जीवनात चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त करून कारखाना चालविताना याला कोणताही राजकीय स्पर्श होणार नाही अशी ग्वाही यावेळी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी दिली. उद्योग टिकले पाहिजे याकरीताच कारखान्यात राजकीय स्पर्श होणार नाही असे सांगून अत्यंत कमी कालावधीत  कारखाना पुनःउभारणीचे काम बोत्रे पाटील यांनी केले असल्याचे आ. निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखान्याच्या रोलरचे पुजन होणार असल्याचे सांगत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी 1 नोव्हेंबर रोजी कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होईल अशी घोषणा यावेळी केली. कारखाना चालू होत असला तरी प्रथम वर्ष असल्याने शेतकर्‍यांचे पाठबळ आणि त्यांचे सहकार्य मिळावे असे आवाहन केले. आगामी काळात शेतकर्‍यांना कारखान्याच्या माध्यमातून अधिकचा लाभ व्हावा याकरीता सहप्रकल्प म्हणजेच मोलॅसीस आणि डिस्टलरी प्रकल्प सुरु होतील अशी ग्वाही दिली. कारखाना चालू होईल की नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र कारखाना आता प्रत्यक्षात सुरु होत असून त्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या सर्व बाबी पुर्ण केले असल्याची माहिती आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. गतवर्षी अनेक शेतकर्‍यांना ऊस गाळपाबाबत मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मात्र यावर्षी आपल्या हक्काचा कारखाना सुरु होत असून कारखाना कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप वेळेत करण्यात येईल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला.
या विभागीय कार्यालयाच्या शुभारंप्रसंगी माजी मत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतुक ठेकेदारांना आगाऊ रक्कमेच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्यासह चेअरमन बोत्रे पाटील यांचा सत्कार केला. याप्रसंगी नरसिंग बिराजदार, गुंडेराव जाधव, अशोक बोंडगे, गुंडेराव पाटील, कडाजी जाधव, विजयकुमार जाधव, प्रकाश कोरे, प्रशांत पाटील, माजी सभापती शंकरराव पाटील तळेगावकर, नागेश जीवने, रामलिंग शेरे, शिवपुत्र आग्रे, अंजली पाटील, डॉ. मल्लिकार्जुन शंकद, अनिल भंडारे आदींसह पक्ष पदाधिकारी, नागरीक व शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने