हासेगाव फार्मसीत जागतिक औषधनिर्माण शास्त्र दिन साजरा

 हासेगाव फार्मसीत जागतिक औषधनिर्माण शास्त्र दिन साजरा

            औसा (प्रतिनिधी )  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत  जागतिक औषधनिर्माण शास्त्र दिन  साजरा करण्यात आला .     या कार्यक्रमाला  संस्थेचे   अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक  कालिदास गोरे, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ),फिजिओथेरपी चे प्राचार्य डॉ  मेश्राम वीरेंद्र  इत्यादी  मान्यवर मंचावर  उपस्थित होते . 
      प्लास्टिकचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम हे लक्षात घेता  जागतिक औषधनिर्माण शास्त्र दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना  अंतर्गत  लातूर येथील प्रत्यकी मेडिकल स्टोर ला  २५० एनोलप  वाटप  केले . या एनोलप वाटपाचा हा उद्देश आहे कि सामाजिक जीवनात वापरात येणारे  प्लास्टिक शासनाने बंदी आणून हि प्लास्टिकचा चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे  म्हणून लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव आणि लातूर कॉलेज ऑफ फार्मसी  लातूर या दोन महाविद्यालयाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे .  
          या कार्यक्रमाला रा.से.यो. चे वॉलिटिअर काळे  लक्ष्मण ,राजदीपप जाधव ,डिंगोरे आशिष , केंद्रे विशाल , काळे अंकित , मानकुस्कर कैस्तुभ गौरव जगदाळे शिंदे शंभू  इत्यादी उपस्थित होते . 
       रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश बनसोडे आणि प्रा. जोशी दीपक त्याच बरोबर  लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  ,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी   उपस्थित होते . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने