ध्येय निश्चित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची -ज्येष्ठ पत्रकार हजारे

ध्येय निश्चित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची -ज्येष्ठ पत्रकार हजारे  

लातूर -ध्येय निश्चित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन  ज्येष्ठ  पत्रकार हजारे यांनी बोलताना व्यक्त केले.  महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त  बी.एस्सी. आणि बी.सी.ए. संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांद्वारा आयोजित कार्यक्रमात बोलताना  व्यक्त केले. यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर सिद्राम डोंगरगे हे होते तर विचार मंचावर सिनेट सदस्य, विज्ञान शाखेचे समन्वयक तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दीपक चाटे,  प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विनायक वाघमारे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.बी.स्वामी, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकशास्त्र प्रभारी विभाग प्रमुख प्रा.वनिता पाटील, संगणकशास्त्र समन्वयक प्रा.सुप्रिया बिराजदार, प्रा. यु. व्ही. धनुरे , प्रा. मनोज गायकवाड, प्रा. शिवेश्वर मुचाटे, प्रा. गजानन खेत्री, प्रा. सुजाता पाटील, प्रा. कांबळे यांची उपस्थिती होती.  
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
या कार्यक्रमाला बी. एस्सी.आणि बी.सी.ए. विभागातील सर्व  विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने