ड्रायव्हर व्यवसायाला शासकीय योजनाची मदत झाली पाहीजे-मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 ड्रायव्हर व्यवसायाला शासकीय योजनाची मदत झाली पाहीजे-मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर-पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 17 सप्टेबर हा ड्रायव्हर दिवस म्हणून घोषीत केला. त्यामुळे असंघटीत असलेल्या व्यवसाईकाना एकत्र येन्याची संधी मिळाली. त्याच प्रमाणे या व्यवसायाचे काम करणार्‍या सर्व ड्रायवर नागरीकाना माथाडी बोर्ड कामगाराणा विविध शासकीय योजनाचा लाभ मिळतो, त्या प्रमाणे लाभ मिळाला पाहीजे, यासाठी आपणा राज्य सरकारकडे पाठपूरावा करू असे प्रतीपादन मा.आ.व भाजपा किसान मोर्चा गोवा प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी ड्रायवर संघटनेच्या मेळाव्यात त्यांना विश्‍वास दिला.
यावेळी प्रादेशिक परिवहन लातूरचे निरीक्षक मा.सुनिल शिंदे, मा. सुभाषअप्पा सुलगुडले, संदीप पाटील, सत्यनारायण पारीख, मुक्‍तार शेख, सतिष पेद्ये, लोकनायक मोटार चालक संघाचे उत्‍तम लोंढे, सुरेश माकने, रसुल पठाण, महादेव जाधव एम.जे. वाहेदभाई, इर्शादभाई, तुषार रेडडी,व कार्यक्रमास आलेले सर्व चालक बंधु उपस्थीत होते.
यावेळी बोलताना कव्हेकर साहेब म्हणाले मार्केट कमीटी सभापती असताना कामगारांना माथाडी बोर्ड लागु करून त्यांना कामाची व दामाची हामी दिली त्यांच्या जिवनामध्ये क्रांती घडली आहे. त्याच पध्दतीने या दूर्लक्षीत ड्रायवर व्यवसाईकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी ड्रायवींग मध्ये शिस्त व सुरक्षा आनन्यासाठी कडक नियम करन्याची घोषना केली. त्यामुळे ड्रायवर  व्यवसाईकानी ड्रायवींग शिक्षण घेउनच नियमाचे पालन करावे आपल्या चुकीच्या ड्रायवींग मुळे कोणाचा प्राण जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी असे अवाहन ही कव्हेकर साहेब यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने