रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

 रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा







(उस्मानाबाद )येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभ हस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे मुख्य प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून उपस्थितांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
     यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की,हैद्राबादच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी श्री स्वामी रामानंद तीर्थ महाराज यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारलेला होता. यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.या सर्व स्वातंत्र्यवीरांना आपण आदरांजली अर्पण करून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला पाहिजे.
   यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक कोल्हे व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने