शेतकऱ्यांच्या उत्पादनास जास्तित जास्त भाव देणारीबाजार समिती म्हणून लातूरचा लौकिकमाजी मंत्री आमदार अमित देशमुख

शेतकऱ्यांच्या उत्पादनास जास्तित जास्त भाव देणारी

बाजार समिती म्हणून लातूरचा लौकिक

माजी मंत्री आमदार अमित  देशमुख


लातूर प्रतिनिधी : 

बाजार समिती नवीन जागेत लवकरच स्थलांतरित होईलत्या ठिकाणी सर्व अद्यावत व्यवस्था उभारण्यात येतीलजगातील बाजारपेठेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात येईल असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगून शेतकऱ्यांच्या उत्पादनास जास्तित जास्त भाव देणारी बाजार समिती म्हणून लातूरचा लौकिक वाढत राहील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

 लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अशोक (गट्टूशेठ) अग्रवाल यांच्या एलबी अग्रवाल आडत दुकानास भेट देऊन, त्यांनी उपस्थिताशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, माजी उपसभापती मनोज पाटील, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, हुकुमचंद कलंत्री, बालाप्रसाद बिदादा, चंद्रकांत पाटील, अजय दुडीले, आशिष अग्रवाल, रामनिवास अग्रवाल, लक्ष्मीरमण अग्रवाल, अजिंक्य सोनवणे, अनिल अग्रवाल, केदार अग्रवाल, कैलास कांबळे, युनूस मोमीन, सुमीत खंडागळे,  सुनील अग्रवाल, अजय शहा, अमर पवार, अंशुम अग्रवाल, शिवाजी कांबळे, संजय माने, राजेसाहेब सवइ, प्रकाश शिंदे, विजय शहा, लखन साबळे, आशिष अग्रवाल, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, दीपक देशमुख, दत्ता जाधव, प्रा.सुधीर अनवले, देविदास बोरूळे पाटील, सुरेश धारुरे, सुधीर बोरूळे  आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, आडते, व्यापारी उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, मार्केट यार्डातील नावाजलेली आडत म्हणून अशोक (गट्टूशेठ) अग्रवाल यांची ओळखली जाते. मार्केट यार्डात राजकारण सुरू होण्या अगोदर ही बाजारपेठ सुरू झाली. त्यामुळे आपले संबंध राजकारणा पलीकडचे आहेत. या बाजारपेठेमध्ये पायाभूत सुविधा नव्याने उभाराव्या लागतील, रस्ते पथदिवे, नाल्या, कराव्या लागतील त्यासाठी नवीन आराखडा तयार करा अशी सूचना त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, नवीन बाजारपेठेत आपल्याला जायचे आहे. आज आपली बाजारपेठ लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतामध्ये सातवी तर मराठवाड्यात पहिली आलेली आहे आपल्या काळातच या बाजारपेठेने गरुडभरारी घेतली तसेच देशात पहिली सर्वोत्कृष्ट बाजारपेठ होण्यासाठी लातूर बाजार समितीने प्रयत्न करावा. पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूरची बाजारपेठ हायटेक होण्यासाठी पावले उचलू सर्वांना एकत्र घेऊन काम करू नवीन बाजारपेठ अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची करूयात. शेती उद्योगाची सर्वाधिक उलाढाल मराठवाड्यात आहे, लातूर जिल्ह्यात तर शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी वाव आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी लातूरचे एअरपोर्टला एअर कार्गो करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करत आहोत, लातूरची साखर जगभरात निर्यात केली गेली आहे.  महाराष्ट्रात साखर उद्योगात लातूरने दबदबा निर्माण केला तो लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळेच असे सांगून त्यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरकमिटी गठीत करावी, नवीन बाजारपेठेच्या जागेत जाण्यासाठी ही समिती सूचना करेल, नव्या बाजाराच्या ठिकाणी आम्ही मूलभूत सुविधा उभारत आहोत, बाजार समितीने खरेदीदार दलालाचे रेटिंग करावे अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की, श्रीलंका पाकिस्तानची  अर्थव्यवस्था ढासळत आहे, पेट्रोल डिझेलचे भाव केंद्र सरकार कमी करत नाही, किराणा मालावर त्यांनी पाच टक्के जीएसटी लावला आहे, केंद्र सरकार सामान्य माणसाच्या उपजीविकेतून पैसा हिसकावून घेत आहे असे सांगितले.  यावेळी त्यांनी सर्वांना श्री गणेश व गौरी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.या बैठकीचे प्रास्ताविक अशोक गट्टूशेठ अग्रवाल यांनी यांनी केले, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर या बैठकीचे सूत्रसंचालन तुळशीराम गंभीरे यांनी केले, तर शेवटी आभार आशिष अग्रवाल यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने