“शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य”कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष कुमार


“शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य”
कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष कुमार




महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील सभागृहात लातूर जिल्ह्यातील १० आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ अश्या एकूण २४ (कॅप्टन, सुभेदार, नायब सुभेदार, हवालदार, नायक, लास नायक, गणर आणि शिपाई) शहिद अधिकारी, जेसीओ आणि जवानाच्या कुटुंबियांचा सन्मान संपन्न
लातूर दि.०५ सप्टेंबर २०२२  
आपल्या देशाला क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यामुळे शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांच्या कुटुंबाप्रती भारतीयांच्या मनामध्ये सन्मानपूर्वक भावना असणे हे आपले प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन कमांडर ऑफिसर ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार यांनी बोलताना व्यक्त केले.
५३ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (अमृत महोत्सव समिती व राष्ट्रीय छात्र सेना), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये स.११वा. “शहीदो को शत शत नमन” या उपक्रमाद्वारे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील वीरता पदक पुरस्काराने शहिद अधिकारी, जेसीओ आणि जवान कुटुंबियांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले यांची उपस्थिती होती तर विचारमंचावार प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत तथा इतिहासकार प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्रमुख अतिथी म्हणून कमांडिंग ऑफिसर ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार, सुभेदार मेजर दीपक कुमार आणि अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक दिनानानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली आणि शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि चमूंनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक करताना कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले म्हणाले की, महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरने आमच्या महाविद्यालयाला शहिदांना शत शत नमन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत. आपण सर्वांनी या सर्व शहिदांना विनम्रपणे अभिवादन केले पाहिजे असे ते म्हणाले.  
पुढे बोलताना कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार म्हणाले की, आज लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण २३ शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या कुटुंबाला भविष्यामध्ये आवश्यक ते सहकार्य करण्याची भावना सुद्धा व्यक्त करतो असे ते म्हणाले.  
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे म्हणाले की, आज आपल्या देशाचा विकास हा जलद गतीने होत आहे. मात्र यामध्ये शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांचे राष्ट्र संरक्षणातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्व क्रांतिकारकांचे विचार आपल्या जगण्यात आणि वागण्यात दिसले पाहिजे. आजच्या तरुणासमोर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यासारखे क्रांतिकारक युवक असले पाहिजे असे सांगून कवी कुसुमाग्रज यांच्या गर्जा जयजयकार या कवितेची आठवण करून दिली.  
या कार्यक्रमांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कॅप्टन अविनाश वसंत सोमवंशी, सुभेदार शेख बशीर हुसेन, हवालदार कदम विश्वनाथ गोपीनाथ, नायक सावंत सावरकर मारुती, सुभेदार भगवान महाडिक, सुभेदार गोविंद सोनटक्के, सुभेदार नारंगवाडे शिवाजी, सुभेदार पवार बंकट बब्रुवान, सुभेदार विजय आनंदराव कुतवाल, सुभेदार श्रीहरी बळीराम शिंदे, सुभेदार जाधव अरविंद भिकाजी, सुभेदार चंद्रसेन मुळे, सुभेदार बब्रुवान क्षीरसागर आणि सुभेदार राम साधू गायकवाड तर लातूर जिल्ह्यातील हवालदार शिवाजी पाटील, नायक श्रीरंगे बिराजदार, नायक कांबळे प्रकाश, नायक कुमार बाळासाहेब, नायक चिलटे सुरेश गोरख, लास नायक माले बालाजी बापूराव, सुभेदार मेटे बिबीशन दगडू, सुभेदार लहाने बाबासाहेब धोंडीराम, सुभेदार बाबू इंगळे आणि सुभेदार हरिश्चंद्र सूर्यवंशी अश्या एकूण २४ शहीद अधिकारी, जेसीओ आणि जवानांच्या कुटुंबियांचा भारत सरकार द्वारा देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ताक्षरांचे  डिजिटल स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये कांता विश्वनाथ कदम आणि आप्पासाहेब कुतवाल यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, प्रा.सुरेंद्र स्वामी यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय गवई यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार शेखर थोरात, सुभेदार भोपाल सिंग, नायब सुभेदार विष्णू कचवे, नायब सुभेदार दिलीप शेंडगे, हवालदार चित्रपाल सिंग, दलवीर सिंग, दादा मोठे, हरी गायकर, पंकज बाविस्कर, अजमेर सिंग, योगेश बारसे, राजेंद्र जाला, देवराज बिस्वा, डॉ.भास्कर रेड्डी, प्रा.शिवशरण हावळे, डॉ.अश्विनी रोडे, एनसीसी ऑफिसर्स, महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मान्यवर, आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आणि एनसीसी कॅडेटने उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने