लातूर काॅलेज फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात केले अन्नदान
औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सवा निमित्त आईच घर या दिव्यांग प्रकल्पामधील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, लातूर या बालगृहातील अनाथ मुलांची एकदिवशीय श्रमदान अन्नदान सेवा केली.
या प्रसंगी संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहाचे मुख्याद्यापक
पंडित लव्हारे प्रमुख अतिथी संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,डॉ. श्यामलीला बावगे (जेवळे) डॉ वीरेंद्र मेश्राम . प्रा. संग्राम देशमुख ,महाविद्यालयातील रा.से.यो. चे कार्यक्रम अधिकारी गणेश बनसोडे आणि विध्यार्थी उपस्थित होते .
या प्रसंगी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या स्टाफ कडून संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह अशा विद्यालयाला मोफत उपचार देण्यात येईल असे प्रतिपादन संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले .
टिप्पणी पोस्ट करा