सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम लिनेस क्‍लबच्या माध्यमातून करावे- लि.डॉ.मंजिरी कुलकर्णी

सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम लिनेस क्‍लबच्या माध्यमातून करावे
- लि.डॉ.मंजिरी कुलकर्णी






लातूर -ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5, हिरकणी या क्‍लबची स्थापना 2022 मध्ये झाली. सेवा हा लिनेसचा स्थायीभाव आहे. समाजाच्या विविध घटकांना न्याय देत सर्वतोपरी मदतीसाठी लिनेस क्‍लबची तत्परता, नवनवीन संकल्पना राबवण्याची उमेद ही संपूर्ण डिस्ट्रिक्ट क्‍लबसाठी प्रेरणादायी आहे. आपण सर्वजन ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिरकणी या परिवाराचे घटक आहात. आपल्या हातून समाजसेवेचे एवढे मोठे कार्य होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याबरोबरच समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे काम लिनेस क्‍लबच्या माध्यमातून यापुढील कालावधीतही करावे, असे प्रतिपादन ऑल इंडिया लिनेस क्‍लब संस्थापक अध्यक्षा लि.डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी केले.



यावेळी त्या औरंगाबाद येथे लिनेस क्‍लब एमएच-5 हिरकणी यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कॉन्फरन्समध्ये बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टिपल अध्यक्षा लि.डॉ.वर्षां झंवर, डिस्ट्रीक्टच्या प्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, रिझन चेअरपर्सन-1 सुलभा देशपांडे, रिझन चेअरपर्सन कमल बरूळे, डिस्ट्रिक्टच्या माजी प्रांताध्यक्षा लता बनवट,  सीडीपी बिना चावला, सीडीपी मालानी, सीडीपी डॉ.भारती वर्मा, डिस्ट्रिक्टच्या माजी मल्टिपल अध्यक्षा लि.सुनिला नरप्पनवार, मल्टिपलच्या सके्रेटरी-टे्रझर डिस्ट्रिक्टच्या सचिव अर्चना नलावडे, साधना पळसकर, उमा मिरजगावे, औरंगाबादच्या लि.अग्रवाल यांच्यासह जळगाव, अमळनेर, नंदूरबार येथील लिनेस पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ऑल इंडिया लिनेस क्‍लबच्या संस्थापक अध्यक्षा कुलकर्णी म्हणाल्या की, महिलाद्वारे चालविला जाणारा व सामाजिक सेवा क्षेत्रात योगदान देणारा क्‍लब म्हणून या सामाजिक संघटनाकडे पाहिले जाते. या माध्यमातून शिक्षण, स्वयंरोजगार, कुटिरोद्योग, लघुउद्योग, महिला सक्षमीकरण, जलसंधारण, पाणीबचत, सौर ऊर्जा जनजागृती, वृक्षारोपन, बेटीबचाव आरोग्य संवर्धन, लसीकरण अशा विविध क्षेत्रामध्ये लिनेस क्‍लब सेवाभावी वृत्तीने कार्य करत असते. या कार्यामध्ये वाढ करून जगातील सर्वात मोठे महिलांचे संघटन करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.
सर्वांना सोबत घेवून जाणारा लिनेस क्‍लब - लि.वर्षा झंवर
लिनेस क्‍लब एचएच-5 हिरकणीच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने काम केले जाते. यामुळे अनेक महिलांना लघु उद्योग उभारून उद्योजक बनण्याची संधी निर्माण करून देण्यात आलेली आहे. सर्वांच्या सुख-दुखःमध्ये सहभागी होवून सर्वच घटकातील महिलांना चौफेर विकासाचं व्हिजन दाखविणारं संघटन म्हणजे लिनेस क्‍लबच आहे असे प्रतिपादन लिनेस क्‍लब मल्टिपल अध्यक्षा लि.वर्षा झंवर यांनी केले.

सर्व समाजातील घटकांनी लिनेसला सहकार्य करावे - लि.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
जनसामान्यांमध्ये रममान होवून त्यांच्या मदतीसाठी धावणारे एकमेव संघटन आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम जगभरात केले जाते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या संघटनाला समाजातील सर्वच घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिरकणीच्या प्रांताध्यक्षा लि.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने