रामनाथ विद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह संपन्न

रामनाथ विद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह संपन्न


आलमला :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. ता. औसा येथे 14 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या आहारामध्ये महत्त्वाचे विविध घटक व त्याची गरज फार असते हे मुलांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यासाठी विद्यालयात विविध जीवनसत्वे, प्रथिने व कर्बोदके असणाऱ्या विविध फळभाज्या पालेभाज्या कडधान्य विविध पौष्टिक फळे यांची सभागृहामध्ये मांडणी करून  विद्यालयातील सर्व मुला-मुलींना राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त याची शेतकरी वेशभूषेमध्ये  प्रबोधन करून सांगितले व त्याची मांडणी एका सभागृहामध्ये व्यवस्थितपणे करण्यात आली होती या सर्व  मुलांना विद्यालयातील सौ.हिंगणे जे.आर., सौ उकिरडे डी. आर., सौ निलंगेकर एस. एस.व  श्री
 भास्कर सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून या बाल शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या  नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील अनिता यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने