ॲड.हसन पाशा पटेल यांच्या श्रद्धांजली सभेस देशातील सहा राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते व सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती


ॲड.हसन पाशा पटेल यांच्या श्रद्धांजली सभेस देशातील सहा राज्यातील शेतकरी संघटनेचे  नेते व सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती





 

लातूर/प्रतिनिधी :माजी आमदार तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांचे द्वितीय चिरंजीव ॲड.हसन पाशा पटेल यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले.या निमित्ताने लोदगा (जि. लातूर ) येथील फिनिक्स  फाउंडेशन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून शोकसंवेदना प्रकट केल्या.

     माजी मंत्री आ.अमित देशमुख,भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे,भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष,माजी खासदार भूपेंद्र सिंग मान,कृषी मूल्य आयोग,भारत सरकारचे सदस्य गुणीप्रसाद ठाकूर (हरियाणा)राजस्थानचे  माजी अधिवक्ता रामपाल जाट(राजस्थान), कर्नाटक रयत संघाचे जगन्नाथ चिलाबट्टी,आ. अभिमन्यू पवार,आ.दिलीप बोरसे,माजी आमदार शिरीष कोतवाल,माजी आमदार वैजिनाथ शिंदे,गणेश हाके,कॉटन असोसिएशनचे महेश शारदा  (दिल्ली )व गोपाळ अगरवाल (हरियाणा),शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळेस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा.पोकळे,माधव वाघ,उत्तमराव कदम,राजाभाऊ पुसदेकर (अमरावती),सतीश देशमुख (अकोट),सूर्यवंशी (चाळीसगाव), लातूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन ललितभाई शाह,वसुंधरा शिंदेशिवाजी केंद्रे,काकासाहेब मोरेसय्यद मशायक,शेख अमीनुद्दीन,शिवाजी पाटील नदीवाडीकर,सत्तार पटेल,बाबुराव पाटीलकुलकर्णी (उस्मानाबाद),पांडे (महिको),शर्मा (जयपूर),राजेंद्र नंन्नावारे (जामखेड),अरूण उंडे(राहुरी),महेश शेळके (जुन्नर)सुशील क्षीरसागर (मोहोळ)शकील पटेल (नागपूर)जि.प. सदस्य इमदाद शेख (वाशीम)रमेश आडसकर,अनिकेत लोहिया (अंबाजोगाई) संजीव  करपे (सिंधुदुर्ग) आदी उपस्थित होते.

    यानिमीत्ताने पटेल यांच्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचे नेते असलेले पाशा पटेल हे सर्वांच्या जिवाभावाचे मित्र आहेत.देशमुख कुटुंबीयांसोबत त्यांचा स्नेह आहे. उच्चशिक्षित हसन यांच्या अकस्मित जाण्याने पटेल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहेत.पटेल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी,अशी प्रार्थना श्रद्धांजली सभेत बोलताना केली.

   भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष माजी खा.भूपेंद्रसिंग मान म्हणाले की,पाशा पटेल हे देशभरातील शेतकऱ्यांच्या दु:खामध्ये धावून जाणारे शेतकरी नेते आहेत. त्यांच्या या दु:खामध्ये देशातील सर्व शेतकरी वर्ग सामील असल्याचे त्यांनी नमूद केले.

   या सभेत कृषी मूल्य आयोग भारत सरकारचे सदस्य गुणीप्रसाद ठाकूर,राजस्थान राज्याचे  माजी अधिवक्ता रामपाल जाट, कर्नाटक रयत संघाचे जगन्नाथ चिलाबट्टीआ.अभिमन्यू पवार,आ.दिलीप बोरसे,रामेश्वर बद्दर,यांनीही मनोगत व्यक्त केले.

    गौरी गणपतीचा सण  असतानाही सहा राज्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,राज्यातील सर्वपक्षीय नेते,विविध पदाधिकारी व आप्तस्वकीय मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने