राजमाता जिजामाता कनिष्ठमहाविद्यालयाचे सीईटी परीक्षेत यश

राजमाता जिजामाता कनिष्ठ
महाविद्यालयाचे सीईटी परीक्षेत यश




लातूर : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ‘सीईटी' परीक्षेत येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत या महविद्यालयातील अनिकेत विश्वनाथ रोकडे याने ९८.७१ पर्सेंटाईल घेऊन महाविद्यालयात प्रथम, समर्थ नरसिंग बावगे याने ९४.९७ पर्सेंटाईल घेऊन द्वितीय, श्रीशैल्य बालाजी लिंबुने याने ९३.५७ पर्सेंटाईल घेऊन तृतीय तर वेदांत संजय गायकवाड याने ८९.४७ पर्सेंटाईल घेऊन या महाविद्यालयात चतुर्थ आला. तसेच संकेत पद्माकर उगीले याला ८७.१७ पर्सेंटाईल, सिद्धी सुरेंद्र कटके ८६.८८, चिन्मय चारुदत्त जोशी ८४, निखील नितीन मोरे ८३, विनय रविंद्र लगदिवे ८३, ओम रमेश अनंतवार ८३, गौरव गौतम कांबळे ८२.९५, साईराज धर्मराज पाटील ७७, श्रुती महादेव माने ७७, सत्यम सुरेश मुनाळे ७७, अभिषेक नानासाहेब तळेकर ७२, प्रसाद रतनलाल तोष्णीवाल ६९, प्रियंका दिगंबर सगर ६१, रमण नामदेव आवसकर ६० व मुकुंदराज उमेश दळवी याला ५७ पर्सेंटाईल मिळाले आहेत. तसेच कुणाल रघुनाथ वळके, गायत्री व्यंकटराव जोशी, पल्लवी विकास माने, अजित सतीश कोलपुके, अमर चंद्रकांत निडवंचे, रमण राम कोयले, दीपक सुभाष राठोड, अंजली प्रमोद हारसुडे या विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत यश मिळविले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या अधीष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, प्रा. स्वाती केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, प्रा. करिश्मा केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, राजीव मुंढे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. एस. एम. जाधव, प्रा. ए. एस. खोत, प्रा. डी. ए. फंड, प्रा. वैशाली पाटील आदींनी कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने