माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते महिला काँग्रेसच्या वतीने(स्त्री) १८००२०३०५८९ हेल्पलाईनचे लॉंचिं

माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते महिला काँग्रेसच्या वतीने

(स्त्री) १८००२०३०५८९ हेल्पलाईनचे लॉंचिंग



लातूर प्रतिनिधी

अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महिलासाठी कायदेविषयक व आरोग्याविषयक मार्गदर्शन आणि सहकार्य व्हावे यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी ‘स्त्री’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर या हेल्पलाईनचे लॉंचिंग करण्यात आले. लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या ‘स्त्री’ STREE हेल्पलाईनचे १८००२०३०५८९ लॉंचिंग माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी लातूर शहरातील आशियाना निवास्थानी करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी  ‘स्त्री’ STREE हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील जिल्हास्तरावर या हेल्पलाईनचे लॉंचिंग करण्यात आले आहे. लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने १८००२०३०५८९ या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना कायदेविषयक तसेच आरोग्याविषयक मार्गदर्शन आणि सहकार्य व्हावे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे सांगितले. तसेच याकामासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी सुरू करण्यात आलेल्या ‘स्त्री’ हेल्पलाईनचा महिलांना कायदेविषयक व आरोग्यविषयक मदत करण्याचा उददेश असून ‘स्त्री’ STREE हेल्पलाईनची महिलांना आपत्तीकाळात मदत करणे आणि महिलांना सक्षम करणे ही या हेल्पलाईनची संकल्पना असल्याचे लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. स्मिता खानापुरे यांनी सांगितले.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. स्मिता खानापुरे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सपना किसवे, केशरबाई महापुरे, सुवर्णा मुळे, सुनंदा इंगळे, योगिता जाधव, तनुजा कांबळे, शिलाताई वाघमारे, वर्षा मस्के, पूजा पंचांक्षरी, सपना खंडेलवाल, लक्ष्मी भडके, सायरा पठाण, अनिता कांबळे, इंदूताई इगे, पूजा इगे, लक्ष्मीताई बटणपूरकर कमलताई मिटकरी, यास्मिन शेख, दीप्ती खंडागळे, रेणुका जोगी, जिजाबाई वाघमारे, जयश्री गुरव,भारतबाई राठोड,सुरेखा इगे, पूनम भांगे, लक्ष्मी मडके आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने