कवी संजय घाडगे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

कवी संजय घाडगे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान


लातूर,दि.१४ः महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक संजय घाडगे यांना परिवर्तन संशोधन नियतकालिका तर्फे दिला जाणारा साहित्यरत्न पुरस्कार रविवार,दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी देवून सन्मानीत करण्यात आले.परिवर्तन संशोधन नियतकालिकाच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीस पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते,यंदाचा साहित्यरत्न पुरस्कार सुप्रसिध्द साहित्यिक संजय घाडगे यांना देवून महाराष्ट्र-गोवा बार असोचे सदस्य ऍड.अण्णाराव पाटील,साहित्यिक प्राचार्य आर.एस.चोपडे,माजी आ. रामराव वडकुते, महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, उपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त मंगेश झोरे, डॉ.हनुमंत किनीकर,संभाजी सुळ, व्यंकटेश चामनर, गोविंद सुरवसे, डॉ.ईश्‍वर यमगर, दशरथ राऊत, प्रा.गौतम गायकवाड,संपादक चंद्रकांत हजारे, शोएब शेख, ज्येष्ठ पत्रकार अमोल पांढरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
लातूर येथील परिवर्तन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते शरद झरे,सहशिक्षक सदाशिव अभंगे यांच्यासह वाचक, साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संजय घाडगे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यंाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने