जलजीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण योजनेची बैठक संपन्न

                                                                                      जलजीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण योजनेची बैठक संपन्न


लातूर- जलजीवन मिशन स्त्रोत बळकटीकरण अंतर्गत लातूर जिल्ह्यातील एकूण 60 गावात 720 योजनाची अंदाजपत्रकिय किंमत रु.738 लाख इतक्या रक्कमेच्या योजनांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाणी पुरवठा योजनांनासुध्दा मान्यता देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, पाणी पुरवठा विभागाचे शेलार कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी एस.बी. गायकवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाणे, कनिष्ठ अभियंता श्री.सोमवंशी, श्री.काटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. नागरगोजे व येलाले तसेच इतर विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा उपअभियंता बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने