जुनी पेन्शन योजना लागू करा -शिक्षक संघटनांचा लातूरमध्ये धडक मोर्चा

 जुनी पेन्शन योजना लागू करा -शिक्षक संघटनांचा लातूरमध्ये धडक मोर्चा

लातूर -प्रतिनिधी-राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना विनाअट  लागू करा या प्रमुख मागणीसाठी लातूरमध्ये शिक्षक संघटनांनी धडक मोर्चा काढला . डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आलेल्या या धडक मोर्च्यात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते . कसलाही भेदभाव न करता सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी शिक्षकांची एकमुखी मागणी आहे . 

--मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात दर रविवारी शिक्षक संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी धडक मोर्च्याचे आयोजन केलेले आहे . लातूरमध्ये झालेल्या या मोर्च्यात शिक्षक-प्राध्यापकांच्या सर्वच संघटना सहभागी झाल्या होत्या . अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच  जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी . राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा ,वर्ग आणि तुकड्याना प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देण्यात यावे . राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱयांना १०,२०,३० अश्या तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी . शिक्षक पाल्याना विहित दराने अर्थसहाय्य  करणारा १६ मार्च २०२१ चा शासन आदेश रद्द करून सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा आदेश लागू करावा .  सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनेत्तर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे ,अश्या अनेक मागण्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या आहेत . 
---या मोर्च्याचे नेतृत्व सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून या मोर्च्याच्या यशस्वीतेसाठी  प्रामुख्याने पी.एस. घाडगे ,व्ही.जी.पवार ,सूर्यकांत विश्वासराव , राजकुमार कदम , जिल्हाध्यक्ष -बी .व्ही . स्वामी , जिल्हा सचिव - जी.व्ही. माने ,  विश्वम्भर भोसले ,जी. जी.रातोळे , ऐन जी माळी ,मधुकर जोंधळे ,सी व्ही माचपल्ले ,अविनाश सावंत , ऐन  एस माळगे , तांबोळी सर ,सुचिता  हांडोळे , पी बी कुंभार , राजकुमार नामवाड , शिवाजी मदलापूरे , प्रवीण माने , आर बी सावंत , अंकुश देवकत्ते , ए. पी. मासुर्णे ,संजीव सिरसाठ , बुरणापल्ले अहेलू , बाबुराव हार्डे , डी जी मोरे यांच्यासह सर्वच शिक्षक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने