नागरिकांची तात्पुरती राहण्याची सोय करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

नागरिकांची तात्पुरती राहण्याची सोय करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर








निलंगा-30 सप्टेंबर 1993 रोजी संपुर्ण देश झोपेत असतानाच किल्लारी औसा येथे 7.8 एवढ्या रिश्टर स्केल एवढा मोठा भुकंप झाला होता. सप्टेंबर महिना उजाडला की सर्व महाराष्ट्रातील लोकांमध्ये भुकंपाची धडकी भरल्याशिवाय राहत नाही. अशातच मौजे. हासोरी (बु) व हासोरी (खु) ता. निलंगा जि. लातूर येथे दि. 06/09/2022 रोजीपासून धक्के जाणवत असून दि. 12/09/2022 रोजी रात्री 10.00 वाजता मोठा धक्का व आवाज झाला असून भुगर्भातून गुढ आवाज येत आहेत. आज दि. 18/09/2022 रोजी या गुढ आवाज व धक्क्याच्या पार्श्वभुमीमुळे खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नागरिकांना दिलासा व मनातील भिती कमी करण्याच्या उद्देशाने मौजे. हासोरी (खु) व हासोरी (बु) येथे जावून नागरिकांची भेट घेवून नागरिकांशी चर्चा केली. जमिनीस धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते हासोरी (बु) व हासोरी (खु) या गावात जुन्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाकडून अशा पध्दतीची जुनी घरे पाडण्याबाबत नागरिकांना सांगितले आहे. अशा जुन्या घरांचा सर्व्हे करुन त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे तसेच या भागामध्ये भुगर्भशास्त्रज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन भुकंप किंवा गुढ आवाज कशामुळे होतात याचा अभ्यास करुन नागरिकांच्या मनातील भिती कमी करणेबाबत मा. जिल्हाधिकारी लातूर यांना या संबंधात चौकशी करण्याची मागणी केली.

            भविष्यात जिवीत व वित्त हानी टाळण्याकरीता येथील नागरिकांना गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड किंवा कापडी तंबु (टेंट) मध्ये राहण्याची व्यवस्था राज्य आपत्ती व्यवस्थापन किंवा जिल्हा नियोजन समिती मार्फत विशेषबाब म्हणुन करावी तसेच जे नागरिक सक्षम नाहीत अशा नागरिकांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था करावी जी घरे प्रशासनाकडून पाडली जात आहेत त्यांना आर्थिक मदत करावी व अशा स्वरूपाचे जे आवाज येत आहेत त्यामागे नेमके कारण काय आहे हे तपासावे व नागरिकांची भीती दूर करावी शा सूचना जिल्हाधिकारीतहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्राद्वारे दिल्या.

 यावेळी संतोष सोमवंशीबजरंग दादा जाधवकिशोर जाधवकिशोर भोसले व तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन चे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने