नामांकित वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी : गोविंदपूरकर

नामांकित वक्त्यांच्या  व्याख्यानांची मेजवानी : गोविंदपूरकर 

लातूर : येथील पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या  वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शारदोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून लातूरकरांना नामांकित वक्त्यांच्या  व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे. ही व्याख्यानमाला दि. ६ ते ९ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत  संपन्न होणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात ही व्याख्यानमाला घेता आली नव्हती.  पूर्ववत सुरु केली जात आहे,असे सांगून अशोक गोविंदपूरकर पुढे म्हणाले की, यावर्षीच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर हे वल्लभभाई पटेल : सामर्थ्यवान नेता, सच्चा अनुयायी या विषयावर गुंफणार आहेत. दि. ७ ऑक्टोबर रोजी चला हवा येऊ द्या फेम लेखक अरविंद जगताप हे गोष्ट छोटी डोंगराएवढी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दि. ८ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक तथा  पत्रकार निशिकांत भालेराव हे हैदराबाद ( मराठवाडा ) मुक्तिसंग्राम समजून घेताना या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर दि. ९ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथील वैद्य परेश देशमुख हे आहारातून आरोग्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानाचा हा कार्यक्रम दररोज सायंकाळी सात वाजता  पूर्णानंद मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. 
या व्याख्यानमालेचे यावर्षीचे अध्यक्ष म्हणून गोविंद कुलकर्णी, सचिव प्रकाश घादगिने यांची निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष महेश दास्ताने, सहसचिव सुमुख गोविंदपूरकर, कोषाध्यक्ष रमेश भोयरेकर, कार्यवाह   बी.आर. पाटील, आर.बी. जोशी , मार्गदर्शक  नाना पाटील, प्रा. डॉ. किरण दंडे , अतुल ठोंबरे, डी.बी. पाठक , नंदकुमार पाठक, बसवंतप्पा भरडे  ,सौ.अमिता गोविंदपूरकर, डॉ. माधवी निरगुडे, कार्यकारिणी  सदस्य म्हणून डॉ.आरती संदीकर,डॉ. आरती जोशी, अब्दुल गालिब शेख, मधुसूदन कुलकर्णी, किरण धुमाळ, कृष्णा कुलकर्णी, प्रथमेश जाधव, समर्थ कुलकर्णी, रोहित कुलकर्णी यांची  निवड करण्यात  आली आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने