लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधूवर मेळावा

  लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधूवर मेळावा

जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

लातूर ः लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्यावतीने रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता रघूकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमात लातूर येथील बसव महामेळाव्यात लिंगायत समाजातील गुणवंतांना देण्यात येणारे जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावगीस्वामी मठसंस्थान उदगीर, खा.सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री संजय बनसोडे, आ.बाबासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.सुधाकर भालेराव, माजी आ.मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल, लिंगायत महासंघाचे प्रदेशउपाध्यक्ष बसवराज करीअप्पा, लिंगायत महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शेटकार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, लिंगायत महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश वाले, लिंगायत संघर्ष समितीचे प्रदिप वाले(सांगली), लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, लिंगायत महासंघाचे जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे राहणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.तानाजी सोनटक्के, बापूराव शेटकार, संगशेट्टी बिरादार, भिमाशंकर शेळके, अशोक तोंडारे, राजकुमार वडले, प्रा.पंडीत देवशेट्टे, शिवशेट्टे सर, प्रा.वीरभद्र घाळे, परमेश्‍वर पटवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
या मेळाव्यात प्रा.प्रभाकर उदगीरे, रामेश्‍वरअप्पा कानडे यांना जीवन गौरव तर अनेकांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे लातूर शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने