पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी


पाणी पुरवठा योजनेसाठी १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी 
रेणापूर/प्रतिनिधी: तालुक्यातील दर्जी बोरगाव व लगत असणाऱ्या ब्रम्हवाडी या गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी  जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यासाठी ग्रामपंचायत सदस्य अंकुश गवळी यांनी पाठपुरावा केला होता.
    दर्जी बोरगाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.परंतु या गावात पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे ग्रामस्थांना मिळेल तेथून पाणी आणावे लागत होते. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अंकुश गवळी यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,तत्कालीन राज्यमंत्री आ.
संजय बनसोडे,आ.धीरज देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
याची दखल घेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्य सचिवांना पत्र देवून या दोन गावांचा जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याच्या सुचना केल्या होत्या.या पाठपुराव्याला यश आले असून दर्जी बोरगाव व ब्रम्हवाडीचा योजनेत समावेश झाला आहे.
   या अंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून दर्जी बोरगाव येथे जलकुंभ उभारण्यात येणार आहे.मांजरा नदीवरील नागझरी बॅरेज मधून जलवाहिनीद्वारे दोन्ही गावात पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामुळे गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.या कामासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून एक वर्षाच्या कालावधीत ही योजना पूर्णत्वास जाणार आहे.यामुळे गावातील पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे.
    ही योजना मंजूर केल्याबद्दल गवळी यांनी अजितदादा पवार,
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,आ.संजय बनसोडे व आ.धीरज देशमुख यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.
   गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत सदस्य अंकुश गवळी यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने