दिनेश जावळे लातूरच्या युवासेना जिल्हाप्रमुखपदी
लातूर : लातूर जिल्हा युवासेना प्रमुखपदी शिवसेना युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश जावळे यांची निवड जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून ही निवड बुधवारी जाहीर करण्यात आली असून या निवडीचे जिल्ह्यातील युवासैनिकांतून जोरदार स्वागत होत आहे.
वडिलांपासूनच घरात शिवसेनेचा वारसा असलेले दिनेश जावळे हे औसा तालुक्यातील लोदगा गावचे रहिवाशी आहेत. शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदावर गेली पाच वर्षे ते सक्रीय कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष वाढीसाठी सातत्याने ते प्रयत्नशील राहिले आहेत. औसा तालुक्यात गावोगाव शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी तत्कालिन जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली काम केले. राज्यात शिवसेना अधिक मजबूत व्हावी, यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षात अधिकाधिक तरुणांना संधी दिली असून जावळे यांच्या या निवडीने जिल्ह्यात युवावर्ग शिवसेनेकडे आकर्षिला जाणार आहे.
दरम्यान आगामी काळात जिल्ह्यात १०० टक्के युवासेना शाखा बांधणीस आपले प्राधान्य राहील, असे दिनेश जावळे म्हणाले. जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून तरुणांचे व युवा वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. आगामी जि.प., पं.स. तसेच महापालिका व नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीसाठी मजबूत संघटना बांधणी केली जाईल, असेही जावळे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा