स्वामी विवेकानंद आयटीआयचा निकाल 99 टक्के

स्वामी विवेकानंद आयटीआयचा निकाल 99 टक्के



लातूर-जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब रोड, लातूर या आयटीआय कॉलेजचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विजतंत्रीमध्ये सय्यद अलवेरिया ही विद्यार्थीनी 600 पैकी 508 गुण घेवून प्रथम आलेली आहे तर तारतंत्रीमध्ये सुजर खुणे हा विद्यार्थी 600 पैकी 441 गुण घेवून प्रथम आलेला आहे. आयटीआय कॉलेजचा एकूण निकाल 99 टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आयटीआय कॉलेजच्या प्रशासन, कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे.
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेज विजतंत्री विभागातून द्वितीय वर्षामध्ये सय्यद अलवेरिया ही विद्यार्थीनी 87.50 टक्के गुण घेवून पहिली आलेली आहे, बालाजी ठोंबरे हा विद्यार्थी 77.50 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकाने तर शंतनू कदम हा 600 पैकी  461 गुण घेवून विजतंत्री विभागामध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. तारतंत्री विभागातून सुरज खुणे हा विद्यार्थी 73.50 टक्के गुण घेवून प्रथम आलेला आहे. शेख युसूफ हा विद्यार्थी 600 पैकी 440 गुण घेवून द्वितीय आला आहे तर दिनेश खरोसे हा विद्यार्थी 600 पैकी 437 गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. जोडारी विभागातून प्रसाद कदम हा विद्यार्थी 600 पैकी 522 गुण  (87 टक्के) घेवून प्रथम आलेला आहे तर वैभव जाधव हा विद्यार्थी 600 पैकी 481 गुण(80.16 टक्के) घेवून जोडारी विभागातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाच्याकामी शासकीय आयटीआयचे सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.के.गाडेकर, प्राचार्य राजकुमार साखरे, स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजचे प्राचार्य संदिप पांचाळ, निर्देशक विजतंत्री ए.पी.मगर, निर्देशक तारतंत्री, एस.एस.भातलवंडे, निर्देशक जोडारी, डी.के.कुलकर्णी, निर्देशक डीटीपी. पी.आर.मोरे मॅडम आदींचे मार्गदर्शन लाभले.  विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव तथा माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील,समन्वयक विनोद जाधव, प्रशासकीय अधिकारी, प्रमोद लोळगे, समन्वयक बापूसाहेब गोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी त्यांचे कौतुक केले.  
विजतंत्रीमध्ये सार्थक जाधवची यशस्वी भरारी
प्रथम वर्ष विजतंत्री विभागातून सार्थक जाधव 83.50 टक्के गुण घेवून प्रथम विजतंत्री विभागातून बळीराम खरजुले 81.83 टक्के गुण घेवून द्वितीय आलेला आहे. प्रथम वर्ष तारतंत्री विभागातून अक्षय दिक्षीत हा विद्यार्थी 79 टक्के गुण घेवून प्रथम आलेला आहे तर ओम कदम हा विद्यार्थी 77.16 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. प्रथम वर्ष डी.टी.पी.विभागातून अभिषेक डोजे हा विद्यार्थी 75 टक्के गुण घेवून प्रथम आलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने