प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे )यांना गुरुवर्य पुरस्कार

     प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे )यांना गुरुवर्य पुरस्कार 





           औसा (प्रतिनिधी ) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसीमहाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे ( जेवळे) यांना शॉल सन्मानचिन्ह आणि गुरुवर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या तर्फे देण्यात आला .
       यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त  मा.अविनाश देवशटवार  व माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब, यांच्या हस्ते गुरुवर्य पुरस्कार देण्यात आला सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, उदगीर चे वैद्यकीय अधिकारी श्री डॉ.पवार दत्ता तसेच गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर जि. लातूर चे अध्यक्ष श्री बापूसाहेब राठोड साहेब, गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर जि. लातूर चे सचिव अमित राठोडहे उपस्थित होते . 
    हा पुरस्कार प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल देण्यात आला . यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे  डॉ. लोणीकर नितीन , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने