शारदा विद्यालय मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात

                                शारदा विद्यालय मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात


लातूर- येथील शारदा विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त प्रा. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम .आर. पाटील होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अण्णासाहेब यादव पाटील, उपाध्यक्ष डॉ. हनुमंत पाटील, माजी सरपंच नागोराव पाटील, सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांसह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने