डॉ कल्याण बरमदे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

लातूर -प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने मुंबईच्या राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते लातूर येथील स्त्री रोग, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्यान बरमदे यांचा महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनिय सेवेबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या राज्यातील निवडक प्रसूतीतज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचा  राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते  राजभवनावर सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या वर्ष 2020 - 22 च्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, वर्ष 2022 - 24 चे  नवनियुक्त अध्यक्ष  डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मान सोहळ्यात डॉ. कल्याण बरमदेंसह एकूण 37 तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. स्त्री रोग, वंध्यत्व निवारण क्षेत्रात डॉ. कल्याण बरमदे यांचे कार्य अत्यंत उल्लेखनिय असे राहिले आहे. आजपर्यंत हजारो निःसंतान दांपत्यांच्या  चेहर्‍यावर हास्य फुलविण्याचे काम डॉ. बरमदे यांनी केले आहे. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा असे समजून चालणार्‍या डॉ. कल्याण बरमदे  यांनी मागच्या काही वर्षात मुंबई - पुण्याच्या तुलनेत अगदी नाममात्र शुल्कात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या महिलांच्या आरोग्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात आला. डॉ. बरमदे यांच्या या सन्मानाबद्दल लातूर आयएमएच्या पदाधिकार्‍यांसह स्त्री रोग तज्ञ संघटनेसह वैद्यकीय क्षेत्रातून  त्यांचे अभिनंदन केले आहे.

Dr.%20Baramade%201
लातूर दि.13 ऑक्टोबर-
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने मुंबईच्या राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते लातूर येथील स्त्री रोग, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्यान बरमदे यांचा महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनिय सेवेबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या राज्यातील निवडक प्रसूतीतज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचा  राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते  राजभवनावर सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या वर्ष 2020 - 22 च्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, वर्ष 2022 - 24 चे  नवनियुक्त अध्यक्ष  डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मान सोहळ्यात डॉ. कल्याण बरमदेंसह एकूण 37 तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. स्त्री रोग, वंध्यत्व निवारण क्षेत्रात डॉ. कल्याण बरमदे यांचे कार्य अत्यंत उल्लेखनिय असे राहिले आहे. आजपर्यंत हजारो निःसंतान दांपत्यांच्या  चेहर्‍यावर हास्य फुलविण्याचे काम डॉ. बरमदे यांनी केले आहे. रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा असे समजून चालणार्‍या डॉ. कल्याण बरमदे  यांनी मागच्या काही वर्षात मुंबई - पुण्याच्या तुलनेत अगदी नाममात्र शुल्कात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या महिलांच्या आरोग्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात आला. डॉ. बरमदे यांच्या या सन्मानाबद्दल लातूर आयएमएच्या पदाधिकार्‍यांसह स्त्री रोग तज्ञ संघटनेसह वैद्यकीय क्षेत्रातून  त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने