2021-22 ची स्थगित MSEB व रस्त्याची व विविध विकास कामे तात्काळ सुरू करावीत – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

2021-22 ची स्थगित MSEB व रस्त्याची व विविध विकास कामे तात्काळ सुरू करावीत – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर 


धाराशिव -जिल्हा नियोजन समिती, उस्मानाबाद (धाराशिव) च्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध प्रलंबीत प्रश्नांवर आणि रखडलेल्या विकासकामांवर चर्चा करुन त्या कामांना तात्काळ मान्यता देऊन कामे सुरु करण्याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली.

याप्रसंगी बोलताना, शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ मध्ये मंजुर डीपी बाबत पालकमंत्री महोदयांकडे मागणी करून मंजुर असलेली जवळपास १८.५० कोटी रु. च्या डीपी च्या कामांची स्थगीती उठवुन सदर कामांना सुरुवात करण्याबाबतची मागणी केली असता दि. ३१ ऑक्टोबर पर्यंत त्या सर्व कामांना सुरुवात करण्यात येईल असे पालकमंत्री महोदयांनी आश्वस्त केले.

मतदारसंघात दौरे करीत असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा नादुरुस्त असून जिल्हा परिषद शाळेच्या इमारती पडघडीस आल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त आणि पडघडीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामास तात्काळ मान्यता देऊन बांधकामास सुरुवात करण्याबाबत पालकमंत्री महोदयांकडे मागणी केली.

धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतीशय दुरावस्था असून त्या रस्त्यांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांना जिल्हा परिषद अंतर्गत मान्यता द्यावी आणि कामे सुरु करावी.

धाराशिव शहरातील महिला रुग्णालयात सध्या ३० खाटांची सुविधा असून खाटांच्या कमतरतेमुळे महिलांच्या प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत त्यामुळे धाराशिव शहरातील महिला रुग्णालयाची दर्जोन्नती करून खाटा वाढीस मंजुरी देणेबाबतही मंत्री महोदयांना विनंती केली.

तसेच धाराशिव जिल्ह्यासाठी मंजुर झालेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून भरघोस निधीची तरतुद करून शासकीय वैद्यकीय जिल्हा रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याबाबत विनंती केली.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसहृ, जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने