मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी समाजजागृतीची गरज- अजितसिंह पाटील कव्हेकर

 मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी समाजजागृतीची गरज- अजितसिंह पाटील कव्हेकर  

लातूर-वर्ल्ड फॅडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून मानसिक आजारावर काम करते. मानसिक आजार झालेल्या व्यक्‍तीला आधार देवून यातून बाहेर काढण्यासाठी 1992 पासून जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात करण्यात आली, परंतु या कार्याला मात्र म्हणावे तशी गती मिळालेली नाही. परिणामी मानसिक आजार असलेल्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या आजारातून बाहेर काढण्यासाठी रूग्ण व सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक जागृतीचे गरज आहे असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग लातूरच्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे प्रशासकीय समन्वयक संचालक निळकंठराव पवार, महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगचे समन्वयक डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य शिरीन मॅडम, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ, उपप्राचार्य महम्मद एजाज, असोसिएट प्रोफेसर अझहर शेख, श्रीमती नसरीन नवाझ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी क्रीडा संकूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रॅली काढण्यात आली. तसेच जेएसपीएम संचलित एमआयडीसी कॅम्पस परिसरात “नुक्कड” नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.  
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंगचे उपप्राचार्य महम्मद एजाज नवाज यांन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.  यावेळी महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने