संस्कृतीचे जतन करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी प्रयत्नशील रहावे- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 संस्कृतीचे जतन करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी प्रयत्नशील रहावे- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर -ज्ञानाच्या क्षितीजावर आपले कर्तत्व सिध्द करण्यासाठी विज्ञान, अध्यात्म व तंत्रज्ञानही अवगत करावे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्राच्या विकासात सहभाग नोंदवावा व या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इस्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजच्या नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या एमआयडीसी येथील सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते. या मेळाव्याला जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, समन्व्यक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक व्ही.बी.जाधव, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ आदी मान्यवरांची उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणातून तेजस्वी विद्यार्थी घडविणे हेच आमचे ध्येय आहे. गेल्या नऊ वर्षापासून पॉलिटेक्निक कॉलेजमधून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून राज्याच्या व देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध कंपन्याच्या माध्यमातून विद्यार्थी कार्यरत आहेत. 21 शतक हे बौध्दिक क्षमतेचे शतक असून ज्यांच्याकडे बुध्दिमत्ता असेल तो संशोधक वृत्तीने जगावर राज्य करण्यासाठी सक्षम असेल असे सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यास करून सर्व कौशल्य आत्मसात करून संशोधन क्षेत्रामध्ये पुढे यावे. असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.
प्रारंभी स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकमधून उत्तीर्ण झालेल्या व विविध कंपन्यामध्ये नोकरीस असलेल्या शुभम गुमरे, मुकेश चामले, विक्रांत खरोसेकर, कु.सादिया शेख आदी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कु.सादिया शेख व चि.मुकेश चामले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दूल गालिब शेख यांनी केले तर आभार प्राचार्य गोविंद यांनी मानले. या मेळव्यास सर्व प्राध्यापक, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
सातत्यपूर्ण परिश्रम व ज्ञानप्राप्‍तीतून यश प्राप्‍त होते
- अजितसिंह पाटील कव्हेकर
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या माध्यमातून थेरी बरोबर प्रॅक्टीकलला महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष कौशल्य वाढीस लागते. उत्तम प्रशासन व तज्ज्ञ मार्गदर्शकामुळे विद्यार्थ्यांना सदैव ज्ञानप्राप्‍तीसाठी दर्जेदार शिक्षणाची सोयही उपलब्ध होते. म्हणूनच स्किल ओरिएंटेड कॉलेज म्हणून या पॉलिटेक्निकची ओळख समोर आलेली आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण परिश्रम व ज्ञानप्राप्‍तीतून विद्यार्थ्यांना यश प्राप्‍त होते असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने