विद्यापीठ युवक महोत्सवात कॉक्सिटला दोन पारितोषिके
लातूर, - नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या राष्ट्रचेतना विद्यापीठ युवक महोत्सवात येथील कॉक्सिट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन सांघिक पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली आहे. सहभागी गुणवंतांचे कौतुक प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील दोन महिन्यांपासून कॉक्सिटच्यावतीने युवक महोत्सवासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात येत होती. यासाठी युवक महोत्सव समन्वयक प्रा. गणेश पवार व प्रा. प्रीती मेटे हे तयारी करून घेत होते. या युवक महोत्सवात कॉक्सिटने ९ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला. लोकनृत्य (दिंडी) व मूक अभिनय या सांघिक कला प्रकारात महाविद्यालयाला तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. नांदेड येथे याचे वितरण सिने अभिनेता मकरंद अनासपुरे व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
युवक महोत्सवात महाविद्यालयातील प्रणिता शिंदे, सृष्टी येरोळकर, मेघाराणी शिंदे, साक्षी गिल्ले, अभिजित सोनवणे, शिवलीला कानाडे, सागर वाडीकर, गौरी भीमपुरे, प्रीती महतो, रेणुका मोरे, संतोषी धुळगंडे, नेहा पांढरे, मंगेश कदम यांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. संभाजी देशमुख, प्रा. नितीन वाघमारे यांसह विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा