औसा प्रतिनिधी-तालुक्यातील नागरसोगा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिवाळीसाठी जनतेला रेशनावर दिवाळी किट देण्याची जाहीर केली त्या निमित्ताने स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा या किटाचे वाटप सरपंच सरोजाताई सुर्यवंशी,यशवंतराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाबुराव गिरी,विठ्ठाबाई भुसणे,कांतू अडसूळे,फावडे, अशोक पाटील यादी रेशन धारकांना
भास्करराव सुर्यवंशी, यशवंतराव सुर्यवंशी, काशिनाथ सुर्यवंशी याच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नवीन सरकारने जनतेसाठी अनेक निर्णय घेण्याचा सपाटा लावला त्यात राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रेशन किट जाहीर केले त्यात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चना डाळ व एक लिटर पामतेलाचा समावेश आहे, महागाईने होरपत असलेल्या जनते साठी "आनंदाचा शिधा" किट महत्त्वाचे ठरणार आहे.
गावातील रेशनकार्ड धारकांना दिवाळीत शंभर रुपयांत रेशन किट मिळत असल्याने जनता खुश आहे.
- दिवाळी गोड व्हावी म्हणून "आनंदाचा शिधा" किट वाटप जाहीर करण्यात आले रवा,चना डाळ, साखर हे आले असून पामतेल येत्या दोन दिवसांत येणार आहे
यशवंतराव शिंदे विविध विकास सोसायटीचे चेअरमन,नागरसोगा
टिप्पणी पोस्ट करा