हासाळा जि पशाळेत दिवाळी अभ्यासिकेचे उपसभापती सोमवंशी यांच्या हस्ते वाटप

हासाळा जि पशाळेत दिवाळी अभ्यासिकेचे उपसभापती सोमवंशी यांच्या हस्ते वाटप
औसा प्रतिनिधी- तालुक्यातील हासाळा येथे कै. मधुकरराव विठ्ठलराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिवाळी अभ्यासिकेचे वाटप महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.हसाळा तंटामुक्तीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने दरवर्षी उन्हाळी व दिवाळी अभ्यासिकेचे वाटप करण्यात येते. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राम क्षेत्रपाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी ,शिवसेना औसा उपतालुकाप्रमुख श्रीधर साळुंके, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, गणेश जाधव, हासाळा सरपंच गणेश टाकळे, उपसरपंच भुजंग पाटील, संजय पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील, शंकर पाटील, विलास पवार, अतुल पाटील, प्रदीप पवार, पुरुषोत्तम पवार, पवन पवार, दीपक पवार, कौशल्याताई देशमुख, यांच्यासह सर्व विद्यार्थी व गावातील नागरिक  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने