‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांची मुलाखत
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर मंगळवार दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी या शाळेत प्रत्येक मुल शिकावं यासाठी रचनावाद, एबीएल, तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींची सुरुवात करून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यात येत आहे. तंत्रज्ञानात वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम तसेच मोबाईल, संगणक, प्रोजेक्टर, कराओके स्टुडिओ, रेकॉर्डिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग स्टुटिओ इत्यादी डिजिटल साधनांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसा वापर करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती शिक्षक सोमनाथ वाळके यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक अजिनाथ शेरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
टिप्पणी पोस्ट करा