श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते भव्य गाव वाईज टेनिस क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते भव्य गाव वाईज टेनिस क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न


महाराष्ट्रातील जवळपास 32संघानी स्पर्धेत सहभाग


औसा(प्रतिनिधी)- तालुक्यातील तपसे चिंचोली येथील कै.सुशिलाबाई त्र्यंबकराव पाटील विद्यालय मैदान येथे 5 दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात संपुर्ण महाराष्टातील 32 संघांनी भाग घेतला होता.भव्य गाव वाईज टेनिस क्रिकेट स्पर्धाचे आयोजक जय भवानी चषक मंडळाच्या  नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन झाले. 

ग्रामीण भागातील तपसे चिंचोली हे गाव या 5 दिवस दोन सत्रात चालणाऱ्या या स्पर्धेमुळे नावाजले गेले आहे. या सामन्यांसाठी असंख्य प्रेक्षकांनी हजेरी लावली. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 51000रू रोख जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या तर्फे द्वितीय पारितोषिक 31000रू, शिवशंकर माधवराव पाटील यांच्या तर्फे तर तृतीय पारितोषिक 21000 आयोजक समितीच्या वतीने ठेवण्यात आले होते. या पाच दिवसीय क्रिकेट सामन्यात जवळपास 32संघानी सहभाग नोंदवला होता. या क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा सामना खुप रंगतदार झाला. बक्षीस वितरण समारंभास जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते  प्रथम पारितोषिक देण्यात आले.यावेळी प्रथम पारितोषिक हिंगोली येथील न्यू स्टार हट्टा या संघाला आणि द्वितीय पारितोषिक 'नरसिंह क्रिकेट संघ चिंचोली व तृतीय पारितोषिक सोलापूर येथील किनी बाॅईस या संघांना मिळाले. 

'अशा मैदानी स्पर्धेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील तरुणांमध्ये मैदानी खेळांची आवड जोपासली पाहिजे. मैदानी खेळामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यासाठी चालना मिळते. तरुणांनी मोबाईल च्या आहारी न जाता खेळाडू बनणे गरजेचे असुन भवानी चषक मंडळ आयोजक तपसे चिंचोली यांनी छान उपक्रम राबविला.. असे याप्रसंगी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे म्हणाले. याप्रसंगी औसा काॅग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, अनिल झिरमिरे, सोमनाथ सांगवे, गणेश लादे आदी मान्यवर उपस्थित होत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने