रामनाथ विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

रामनाथ विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न


आलमला: रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे दि. ३० ऑक्टोबर रोजी सन १९९९ एसएससी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहाची भेट व्हावी म्हणून स्नेह मेळावा अर्थात गेट-टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ अनिता पाटील, प्रमुख अतिथी प्राध्यापक अशोक कदम, पर्यवेक्षक श्री पी सी पाटील हे उपस्थित होते. सर्वप्रथम माजी विद्यार्थी शरद निलंगेकर यांनी या स्नेह मेळाव्या पाठीमागची भूमिका विशद करून सांगितली. त्यानंतर प्राध्यापक सचिन जडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थी आयटी कंपनीत नोकरी, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यालयास वाटर कुलर ही स्नेह भेट म्हणून दिली. संस्थेच्या वतीने प्राचार्या अनिता पाटील सर्व विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. अनुजा पेठे या नॅशनल खेळाडूनेही सहभाग नोंदवून शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. २४ वर्षाच्या कालावधीनंतर सर्व विद्यार्थी एकत्र येऊन शाळेप्रती व आपल्या मैत्री प्रती जाणीव जागृती करून आनंद उत्सव साजरा केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पाटील पी‌ .सी यांनी व प्राचार्या सौ. अनिता पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक अशोक कदम यांनीही विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात विजय लांडगे हा टीकिट कलेक्टर मुंबई, रामनाथ अग्रो उद्योजक निलेश वाडकर, आय टी क्षेत्रातील शिवाजी लोहारे पुणे, किरण धाराशिवे, रामेश्वर धाराशिवे, सौ यज्ञसेनी हजारी, तानाजी बिडवे, राजू गुरव, विकास वाघमारे, सौ अनुपमा जडगे, स्नेहा लोणारे, ज्योती लोहारे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ईश्वर वाडकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने