उपायुक्त महेबूब कासार यांचीराजमाता जिजामाता संकुलास सदिच्छा भेट



उपायुक्त महेबूब कासार यांची
राजमाता जिजामाता संकुलास सदिच्छा भेट



लातूर :  वस्तू व सेवा कर विभागाचे (जी. एस. टी.) राज्याचे उपायुक्त महेबूब कासार यांनी लातूर येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलास सदिच्छा भेट दिली असता संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी कासार यांचे शाल, फेटा व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी उपायुक्त कासार यांना प्राचार्य केंद्रे यांनी, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबतच गणवेश, शैक्षणिक साहित्य मोफत पुरविणे, विद्यार्थ्यांच्या जादा तासिका घेणे यासोबतच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकून राहावा व त्यांचे मनोबल वाढावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. हे ऐकून कासार यांनी समाधान व्यक्त करून संकुलाचे कौतुक केले. कासार व प्राचार्य केंद्रे यांचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील रोहिणा असल्याने गावातील जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. कासार हे विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करतात. त्यामुळे रोहिणा गावातील आतापर्यंत ६५ तरुण पोलिस दलात रूजू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी बाळगून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे, असे आवाहन कासार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. या प्रसंगी प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, विष्णू कराड आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने