ज्ञानप्रकाशच्या 120 विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई


ज्ञानप्रकाशच्या 120 विद्यार्थ्यांनी  केले कळसूबाई



लातूर -ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प मुलांना वेगवेगळ्या अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देत असतो.सहली त्यातलीच एक महत्त्वपूर्ण भाग.ज्ञानप्रकाशची प्रत्येक सहल वैविध्यपूर्ण आयोजित केली जाते.ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक,नैसर्गिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांना भेटी द्याव्यात आणि त्यांच्यातील परस्पर सुसंवाद वाढावा त्यामागची मुख्य भूमिका असते.
मागील दोन वर्षांच्या कोविड नंतर पहिल्यांदा मुलांना यावर्षी सहलीचा आनंद घेता आला.
पश्चिम घाटातील अतिशय महत्त्वाचे आणि पर्यटकांचे,गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण हरिशचंद्र गड ( गिरिदुर्ग 1422 मी) जमिनीला प्रस्तरभंग होऊन पडलेली एक मोठी दरी सांदण दरी जो निसर्गाचा एक चमत्कारच. मुलांनी तेथे रॅपलिंग व हळुवारपणे मोठमोठ्या पाषाणावरून उतरून पाण्यात आनंद घेतला.
सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर कळसुबाई (1646 मी उंच) या ठिकाणावर पोहोचून 120 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी राष्ट्रगीत म्हणून भारत मातेचा जयघोष करून आनंद व्यक्त केला.
 दिनांक 14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या दरम्यान 9 वी व 10 वी वर्गाच्या साहस सहलीच्या दरम्यान रात्री टेंट मध्ये राहणे, निसर्गाच्या सानिध्यात राहून निरीक्षण करणं असा सगळा अनुभव मुलांनी घेतला.
सहली सोबत मुख्याध्यापिका व संचालिका नरहरे मॅडम, पर्यवेक्षक अशोक गुरदाळे, पाटील सर, नर्मदा ट्रॅव्हल्सचे स्वामी, पालक व शिक्षक होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने