मोनिका पाटीलची निवड
लातूर/प्रतिनिधी ः जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या एकंबी येथील मोनिका जयानंद पाटील या तरुणीची महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडिल पारंपारिक शेती व्यवसाय करीत असताना मोनिका हीने जिद्दीने आणि चिकाटीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परिक्षेची तयारी करून ती उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे राज्यस्तरावर विद्यार्थिनींमध्ये मोनिका हीने ९ वा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तिची राज्य उत्पादन शुल्क पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. याबद्दल मोनिकाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा