बीएस्सी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ परीक्षेत कॉक्सिट अव्वल

बीएस्सी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ परीक्षेत कॉक्सिट अव्वल
सुवर्ण पदकासह द्वितीय व तृतीय क्रमांकावरही कॉक्सिटचे विद्यार्थी लातूर- नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. यात येथील कॉक्सिट महाविद्यालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची अखंड परंपरा कायम राखली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तायादीत पहिले तिन्ही विद्यार्थी कॉक्सिटचे आले आहेत. विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या या उन्हाळी - २०२२ परीक्षेत कॉक्सिट महाविद्यालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागातून तृतीय वर्षातील आरती राजेंद्र मुळे या विद्यार्थिनीने ९३.५२ टक्के गुण मिळवत ती विद्यापीठात सर्वप्रथम आली आहे. ती विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. कॉक्सिटचीच गीता अनिल शिंदे या विद्यार्थिनीने ९०. ५६ टक्के गुण मिळवत ती विद्यापीठात द्वितीय आली आहे. तर ऋतुजा गुणवंत बंदले हिने ८९. ०४ टक्के गुण घेत ती विद्यापीठात तृतीय आली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. ईश्‍वर पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने