जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत

जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत

परस्पर सामंजस्याने वाद सोडविण्याची संधी

लातूर-जिल्हा सत्र न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये 12 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 6 हजार 348 प्रलंबित प्रकरणे तसेच  दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून), आपसात तडजोड करण्याजोगी फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद इत्यदी प्रकरणांवर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणी होईल.राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा. ज्या पक्षकारांची न्यायालयात प्रलंबित असतील किंवा दाखलपूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने